प्राणी विविधताः संकल्पना आणि महत्त्व (भाग १ आणि २) NEP-2020 Book | Animal Diversity NEP-2020 Book |

Year/Semester: 1th Year -
Duration: Unlimited
Book Pages: 128

E-Book Price:
₹ 21 ₹ 30 (30% Off)
Physical Book Price:
₹ 130 ₹ 150 (13% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       

'प्राणी विविधताः संकल्पना आणि महत्त्व (भाग १ आणि २)' हे पुस्तक केवळ एक अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साधन नसून, मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी प्राणीशास्त्र शिकण्याच्या प्रवासातील एक मार्गदर्शक ठरावे, हीच या ग्रंथामागील भूमिका आहे. मराठीमध्ये उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या दर्जेदार शैक्षणिक साहित्याची मर्यादा लक्षात घेता, विशेषतः प्राणीशास्त्रासारख्या आकृती, संकल्पना व कार्यप्रणालीवर आधारित विषयासाठी हे पुस्तक एक मौल्यवान भर ठरते.

या पुस्तकात संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आल्या असून, सोदाहरण विश्लेषण, आकृतींचा प्रभावी वापर आणि जीवनाशी जोडलेले संदर्भ दिले गेले आहेत. त्यामुळे विषय समजून घेण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सुलभ, सृजनशील आणि स्वाभाविक बनते. प्राणी विविधतेच्या शारीरिक वैशिष्ट्यांबरोबरच त्यांच्या वर्तन, अधिवास आणि जैविक साखळ्यांतील भूमिकेचीही समज यातून मिळते.

मराठी माध्यमातून प्राणीशास्त्र शिकणाऱ्यांना सहजतेने संज्ञा समजाव्यात म्हणून इंग्रजी संज्ञा कोष्ठकात देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते विषयाशी अधिक आत्मीयतेने जोडले जातात. मातृभाषेतून शिकल्याने संकल्पनांचा केवळ अभ्यास न होता, त्यांचा अनुभव घेण्याची प्रक्रिया घडते. ही एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शैक्षणिक पायरी मानता येईल.

 


 

अनुक्रमणिका

भाग १

प्रकरण - 1
१.१ सृष्टी प्रोटिस्टा (Protista)
आदिजीव प्राण्यांचे सर्वसाधारण वैशिष्ट्ये (General Characters of Protozoa), प्लास्मोडियम व्हायव्हॅक्सचे जीवनचक्र (Life cycle of Plasmodium)
१.२ रंध्रीय प्राणीसंघ (Porifera) 
रंध्रीय प्राणीसंघाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये (General Characters of Porifera), रंध्रीय प्राण्यांमधील कालवा प्रणाली (Canal System in Porifera)
१.३ सिलेंटराटा / निडारीया प्राणीसंघ (Coelenterata) 
संघ सिलेंटराटाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये (General Characters of Coelenterata), प्राणीसंघ सिलेंट्रेटा मधील बहुरुपता (Polymorphism in Coelenterata)
१.४ चपटकृमी प्राणीसंघ (Platyhelminthes) 
संघ चपटकृमीचे सर्वसाधारण वैशिष्ट्ये (General Characters of Platyhelminthes)

प्रकरण - २
२.१ पट्टकृमीचे जीवनचक्र (Life cycle of Taenia Solium)
२.२ गोलकृमी प्राणीसंघ (Aschelminthes)
२.३ परजीवी अनुकुलन (Parasitic Adaptations)
२.४ अॅस्कॅरिस लुब्रिकॉयडीसची बाह्य रचना
(External Structure of Ascaris Lumbriocoides)

प्रकरण - ३
३.१ वलयी प्राणीसंघ (Annelida)
कायखंड-खंडीभवन (Metamerism)
३.२ गांडूळ संर्वधन आणि गांडूळ खत निर्मिती
(Vermiculture and Vermicomposting)
३.३ संधिपाद प्राणीसंघ (Arthropoda) कीटकांमधील सामाजिक वर्तन (Social Life in insects)
३.४ कोळंबीचे बाह्यवर्णन
(External Morphology of Palaemon/Prawn)

प्रकरण ४
४.१ मृदुकाय प्राणीसंघ (Mollusca)
४.२ मृदुकाय प्राण्यांचे आर्थिक महत्त्व
(Economic Importance of Mollusca)
मृदुकाय प्राण्यांमध्ये मोत्यांची निर्मिती (Pearl formation), पीलाची बाह्य रचना (External Morphology of Pila)
४.३ कंटकचर्मी प्राणीसंघ (Echinodermata)
४.४ तारामाशाच्या जलवाहिका संस्थेची रचना
(Water Vascular System in Starfish)
तारा माशाच्या शरीराचे बाह्यवर्णन (External Morphology of Starfish)

 

भाग २


प्रकरण - ५
५.१ गट : आदिपृष्ठरज्जू प्राण्यांचे सर्वसाधारण वैशिष्ट्ये
(Silent Features of Protochordates)
५.२ अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघाचे सर्वसाधारण वैशिष्ट्ये
(General Characters of Hemichordata)
५.३ बॅलॅनोग्लॉसस सवय आणि निवासस्थान
(Balanoglossus - Habit and Habitat)
५.४ अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्यांचे इतर प्राण्यासोबतचा वंशेतिहास/जवळीक
(Affinities of Hemichordata)

प्रकरण - ६
६.१ उपसंघ शीर्षसमपृष्ठरज्जू (Cephalochordata)
६.२ बँकीओस्टोमा सवय आणि निवासस्थान (Habit and Habitat)
ब्रैंकीओस्टोमा आकार आणि शरीररचना (External Morphol-ogy), शीर्षसमपृष्ठरज्जू प्राण्यांचे इतर प्राण्यासोबतचा वंशेतिहास /जवळीक (Affinities of Cephalochordata)
६.३ पुच्छसमपृष्ठरज्जू प्राण्यांचे सर्वसाधारण वैशिष्ट्ये
(General Characters of Urochordata)
पुच्छसमपृष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरण (Classification of Urochordata), हर्डमानिया सवय आणि निवासस्थान (Habit and Habitat), हर्डमानिया शरीररचना (External Morphology of Herdmania)
६.४ पुच्छसमपृष्ठरज्जू प्राण्यांचे इतर प्राण्यासोबतचा वंशेतिहास / जवळीक
(Affinities of Urochordata)

प्रकरण - ७
७.१ मत्स्य अधिवर्ग (Superclass pisces) रोहू माशाचे वर्गीकरण आणि बाह्य रचना (Labeo rohita Classification and External Morphology)
७.२ स्कॉलिओडॉनचे वर्गीकरण आणि बाह्यरचना (General Characters of External Morphology) माशांमधील पालकत्वाची जबाबदारी (Parental Care in fishes)
७.३ उभयचर प्राणीवर्ग (Amphibia) उभयचर प्राण्यांतील जिवनानुकूलन (Adaptations for terrestrial life), उभयचरामधील पालकत्वाची जबाबदारी (Parantal Care in Amphibia)
७.४ बेडकाची बाह्य संरचना (External Morphology of Frog) बेडकाचे जीवनचक्र (Life Cycle of Frog)

प्रकरण - ८
८.१ सरीसृप प्राणीवर्ग (Class- Reptiles)
८.२ विषारी व बिनविषारी साप
८.३ पक्षीवर्ग (Class- Aves) हवेमध्ये उडण्यासाठी पक्षांमध्ये झालेले अनुकुलन (Flight Adaptations in birds)
८.४ सस्तन प्राणीवर्ग (Class- Mammalia) मानवाचे वर्गीकरण (Classification of Human), सस्तन प्राण्यांतील दंतविन्यास (Dentition in mammals)

No Author
  • --
  • --

प्राणी विविधता: संकल्पना आणि महत्त्व (भाग - १ आणि २)

Animal Diversity : Part I & II 

: लेखक : 

1. प्रा. यशवंत बी. पटणे

2. डॉ. व्ही. एन. वाघमारे 
 


 

प्रा. यशवंत बी. पटणे

एम.एस्सी. (प्राणीशास्त्र) बी.एड., सेट प्राणीशास्त्र विभाग, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील प्राणीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत. शिक्षण एम.एस्सी. प्राणीशास्त्र व बी.एड. चे शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून घेतले. Life Science विषयात महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) उत्तीर्ण. मधमाशीपालन, रेशीमशेती आणि गांडुळखत निर्मिती इत्यादी विषयांवर विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम व प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण, प्रकाशित पुस्तके 1. The Overview on Biodiversity of Chordates. 2. A Text book of Vermiculture & Vermicomposting.

 

 
डॉ. व्ही. एन. वाघमारे 

एम.एस्सी. (प्राणीशास्त्र), बी.एड., पीएच.डी. सहयोगी प्राध्यापक व प्राणीशास्त्र विभागप्रमुख, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून प्राणीशास्त्र (मत्स्यशास्त्र) विषयात पदव्युत्तर शिक्षण (M.Sc.) पूर्ण. २००९ साली पीएच.डी. पदवी प्रदान. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, अनेक ठिकाणी संशोधन निबंध सादर. १८ संशोधन लेखांचा समावेश हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध. चार पुस्तकांचे लेखन 1. A Text Book of Invertebrate Zoology. 2. Aquaculture, 3. Physiology & Biochemistry, आणि 4. The Overview on Biodiversity of Chordates यांचा समावेश आहे.

 

 


 

Animal Diversity : Concept and Importance (Part -1 & 2)
Author :
1. Asst. Prof. Y. B. Patne,
2. Prof. Dr. V. N. Waghmare
ISBN 978-93-6342-130-1
Copyright © Authors
: First Editon :
15 March 2025

0

Average Rating

0%Recommended

Submit Your Review

Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product

Research...

₹ 39 ₹ 50
Product
Product
Product
Product

मला...

₹ 20 ₹ 40
Product
Product
Product
Product
Product