भारतीय समाज : संरचनात्मक बदल आणि सामाजिक समस्या NEP 2020 Book
| Duration: | 24 Months |
|---|---|
| Book Pages: | 288 |
| E-Book Price: |
₹ 29
|
|---|---|
| Physical Book Price: |
₹ 240
|
| E-Book Buy Date: |
--
|
|---|---|
| E-Book Expiry Date: |
--
|
| Audio Buy Date: |
--
|
| Audio Expiry Date: |
--
|
आर्यांच्या 'भरत' टोळीचे आगमन जेव्हा या प्रदेशात झाले, तेव्हा त्यांच्या नावावरून 'भारत' हे नाव पडले असावे, असा काही इतिहासकारांचा दावा आहे. तर काही इतिहासकारांच्या मते, आर्यांच्या टोळ्या वायव्य सरहद्दीवरून 'सिंधू' नदीच्या काठी वसल्या तेव्हा त्या नदीच्या नावावरून सिंधू प्रदेश असे नाव प्रचलित झाले. इराणी लोकांच्या आगमनानंतर त्यांच्या भाषेत 'स' च्या जागी 'ह' चा अधिक वापर होत असल्याने 'सिंधू'चे अपभ्रंश रूप'हिंदू' असे झाले. ग्रीक लोक जेव्हा या प्रदेशात आले तेव्हा त्यांनी 'हिंदू'चे 'इंदू' असे रूपांतर केले. पुढे युरोपियन लोकांच्या आगमनानंतर 'इंदू'चे 'इंडिया' असे नामकरण झाले.
स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानचे विभाजन होऊन मुस्लिम बहुसंख्यांक असलेल्या प्रदेशाला 'पाकिस्तान' हे नाव देण्यात आले. मात्र, हिंदुस्थान हे फक्त 'हिंदूंचे राष्ट्र' न राहता 'सर्व धर्म समभावा'च्या तत्त्वावर धर्मनिरपेक्ष, 'बहुभाषिक, बहुधर्मीय, बहुवंशीय' असे स्वतंत्र राष्ट्र व्हावे, या उद्देशाने 'हिंदुस्थान' या शब्दाऐवजी 'भारत' या शब्दाला घटनात्मक मान्यता देण्यात आली. प्राचीन काळी 'भरत राजाची' कारकीर्द समृद्धीची म्हणून ओळखली जात असल्याने स्वातंत्र्यानंतर त्या स्मरणातूनच देशाला 'भारत' हे नाव देण्यात आले.
भारत हा प्राचीन परंपरा, संस्कृती, धर्म व भाषा यांसारख्या विविधता असलेला देश आहे. भारतीय समाजाची रचना अत्यंत गुंतागुंतीची, बहुविध व समृद्ध परंपरेने नटलेली आहे. "एकता आणि विविधता" हे भारतीय समाजाचे सर्वात ठळक वैशिष्ट्य मानले जाते. भारतीय समाजात परंपरा व आधुनिकता, धार्मिकता व धर्मनिरपेक्षता, ग्रामीणता व शहरीकरण यांचा अद्भुत संगम घडलेला आहे. भारतीय समाजाची वैशिष्ट्ये हजारो वर्षांच्या इतिहास, तत्त्वज्ञान आणि सामाजिक विकासाने घडत आली आहेत. भारतीय समाजाला एका विशिष्ट वैशिष्ट्याने परिभाषित करता येत नाही, तर अनेक वैशिष्ट्यांच्या अनोख्या गुंतागुंतीने तो ओळखला जातो.
अभ्यासक्रम
भारतीय समाज : रचना आणि बदल
(Indian Society: Structure and Change)
१. भारतीय समाज ओळख आणि दृष्टीकोन (Indian Society: Identity and Perspective)
१.१ भारतीय समाजाची वैशिष्ट्ये.
१.२ विविधतेतील एकता एकता वाढविणारे घटक.
१.३ भारतीय प्राच्यविद्या दृष्टीकोन डॉ. जी. एस. घुर्ये.
१.४ संरचनात्मक कार्यात्मक दृष्टीकोन डॉ. एम. एन. श्रीनिवास.
२. भारतीय समुदाय (Indian Communities)
२.१ आदिवासी समुदाय : अर्थ, वैशिष्ट्ये आणि बदलणारे स्वरूप.
२.२ ग्रामीण समुदाय : अर्थ, वैशिष्ट्ये आणि बदलणारे स्वरूप.
२.३ नागरी समुदाय: अर्थ, वैशिष्ट्ये आणि आगामी आव्हाने.
२.४ धार्मिक समुदाय : भारतातील धार्मिक विविधता.
३. भारतीय समाजातील सामाजिक मूल्ये (Social Values in Indian Society)
३.१ धर्मनिरपेक्षता: अर्थ, महत्त्व आणि अडथळे.
३.२ राष्ट्रीय एकात्मता : अर्थ, स्वरूप आणि गरज.
३.३ लोकशाही : अर्थ आणि लोकशाहीपुढील आगामी आव्हाने.
३.४ सामाजिक सलोखा महत्त्व, अडथळे आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचे उपाय.
४. आधुनिक भारताचे बदलते स्वरूप (Changing Nature of Modern India)
४.१ जागतिकीकरण: अर्थ आणि भारतीय समाजावरील परिणाम.
४.२ आधुनिकीकरण: अर्थ आणि आधुनिक समाजाचे घटक.
४.३ औद्योगिकीकरण अर्थ आणि भारतीय समाजावरील परिणाम.
४.४ खाजगीकरण : अर्थ आणि भारतीय समाजावरील परिणाम.
भारतीय समाजातील सामाजिक प्रश्न आणि समस्या (Social Issues and Problems in Indian Society)
५. सामाजिक समस्येची ओळख (Introduction)
५.१ सामाजिक समस्येचा अर्थ आणि संकल्पना
५.२ सामाजिक समस्यांकडे पाहण्याचे सैद्धांतिक दृष्टिकोन
५.३ सामाजिक प्रश्नांमध्ये समाजशास्त्राची भूमिका चिकित्सक विश्लेषण
५.४ सामाजिक समस्यांचे परिणाम आणि उपाययोजना
६. सामाजिक प्रश्न (Social Issues)
६.१ गरिबी / दारिद्र्य : संकल्पना, कारणे आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना
६.२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या: कारणे आणि प्रतिबंधात्मक धोरणे
६.३ युवक असंतोष : स्वरूप, कारणे आणि परिणाम
६.४ सांप्रदायिकता : संकल्पना, परिणाम आणि भारतातील सांप्रदायिक प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पावले
७. लैंगिक/लिंग असमानता आणि भेदभाव (Gender Inequality & Discrimination)
७.१ लिंग/लैंगिक असमानता आणि भेदभावाचे पैलू
७.२ अदृश्य हिंसा व घरगुती हिंसा/कौटुंबिक हिंसाचार : अर्थ आणि संकल्पना
७.३ आम्लहल्ले (अॅसिड हल्ला) आणि सन्मान हत्याकांड (ऑनर किलिंग) : स्वरूप आणि कारणे
७.४ लैंगिक छळ : संकल्पना, स्वरूप आणि परिणाम
८. गुन्हे आणि न्यायव्यवस्था (Crime & Justice)
८.१ गुन्हा : संकल्पना आणि गुन्ह्याची कारणमीमांसा करणाऱ्या समाजशास्त्रीय सिद्धांतांची मांडणी
८.२ पांढरपेशीय गुन्हे (White Collar Crime) आणि भ्रष्टाचार संकल्पना आणि कारणे
८.३ गुन्हे व गुन्हेगारांचे बदलते स्वरूप
८.४ भारतातील फौजदारी न्यायव्यवस्थेचा आढावा पोलीस, न्यायालय आणि कायदा
- --
- --
भारतीय समाज : संरचनात्मक बदल आणि सामाजिक समस्या
(Indian Society: Structural Changes and Social Problems)
: संपादक :
प्रा. डॉ. पांडूरंग राजाराम मुठ्ठे
समाजशास्त्र विभाग प्रमुख,
शिवनेरी महाविद्यालय शिरूर अनंतपाळ, जि. लातूर
तथा
सदस्य समाजशास्त्र अभ्यासमंडळ, सदस्य विद्याशाखा
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड