पर्यावरण जागृती NEP-2020 Book | Environmental Awareness NEP-2020 Book |

Year/Semester: 1th Year -
Duration: Unlimited
Book Pages: 96

E-Book Price:
₹ 19 ₹ 29 (34% Off)
Physical Book Price:
₹ 110 ₹ 120 (8% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       

पर्यावरण जागृती हे पुस्तक पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण भूगोल या समकालीन व महत्वाच्या विषयांवर आधारित आहे. या पुस्तकात नैसर्गिक संसाधने, पर्यावरणीय संतुलन, प्रदूषण, जैवविविधता, निर्वनीकरण, जागतिक तापमानवाढ, पर्यावरणीय कायदे, व्यवस्थापन आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.
पुस्तकात पर्यावरण भूगोलाच्या मूलभूत संकल्पना सोप्या भाषेत मांडल्या असून, नैसर्गिक घटक आणि मानवी क्रियाकलाप यांच्यातील परस्परसंबंध विविध उदाहरणे व आकृत्यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांचा आढावा घेऊन त्यांचे निराकरण व भावी पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरण कसे राखता येईल यावर भर देण्यात आला आहे.
वाचकांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव आणि जबाबदारी निर्माण करणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी, संशोधक आणि पर्यावरणप्रेमींसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

 


 

अनुक्रमणिका

१. प्रस्तावना (Introduction)

२. पर्यावरण प्रदूषण (Environmental Pollution)

३. जागतिक समस्या (Global Issues)

४. प्रदूषण कमी करण्यात व्यक्तीची भूमिका (Role of an Individual in Pollution Mitigation)

No Author
  • --
  • --

पर्यावरण जागृती (Environmental Awareness)

: लेखक : 

1. डॉ. राजकुमार गोविंदराव पवळे

2. डॉ. भागवत नामदेवराव पस्तापुरे

 


 

डॉ. राजकुमार गोविंदराव पवळे

पर्यावरणशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, नांदेड येथे कार्यरत आहेत. त्यांना २८ वर्षांचा समृद्ध अध्यापनाचा अनुभव आहे. सन २००४ मध्ये त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून "Characterization of Fluoride and Iodide from major Drinking Water Reservoirs in Nanded District and Its Significance" या विषयावर पीएच.डी. पदवी प्राप्त केली. पर्यावरणशास्त्र विषयात त्यांचा अभ्यास, संशोधन आणि सामाजिक सहभाग लक्षणीय असून त्यांनी शिहोर, भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत बीजभाषण (Keynote Address) दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विद्यार्थी सध्या पीएच.डी. करीत असून दोन विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्राप्त झाली आहे. विशेषतः त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील अनेक महाविद्यालयांचे "ग्रीन ऑडिट" प्रभावीपणे पार पाडले आहे, जे पर्यावरणीय शाश्वततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण कार्य ठरले आहे. डॉ. पवळे हे २०१७ पासून विद्यापीठाच्या अभ्यासक्रम समितीचे (BoS - Environment and Earth Science) सदस्य म्हणून कार्यरत असून अभ्यासक्रम विकास व गुणवत्ता सुधारणा यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांचा विषयातील सखोल अभ्यास, संशोधनातील समर्पण, विद्यार्थ्यांशी असलेला संवाद आणि पर्यावरण विषयावरील सामाजिक भान यामुळे ते एक कुशल शिक्षक, संशोधक व पर्यावरणप्रेमी विचारवंत म्हणून ओळखले जातात.

 


 

डॉ. भागवत नामदेव पस्तापुरे

इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, नांदेड येथील भूगोल विभागात पदवी व पदव्युत्तर स्तरावर अध्यापन करत असून त्यांना या क्षेत्रात २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. अध्यापनासोबतच संशोधन क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांचे ५० हुन अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांनी परळी येथील महाविद्यालयात आयोजित "Need of Environment and Water Conservation" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारमध्ये बीजभाषण (Keynote Address) दिले आहे. सन २००८ मध्ये त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे "A Study of Rural Habitat in Nanded District" या विषयावर पीएच.डी. संशोधन कार्य पूर्ण केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत चार विद्यार्थ्यांनी विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्राप्त केली असून सध्या चार विद्यार्थी संशोधन करीत आहेत. डॉ. पस्तापुरे हे MAG (Marathwada Association of Geographers) आणि महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद यांचे अजीव सदस्य आहेत. २०२३ पासून ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विषयाच्या अभ्यास मंडळावर (BoS) सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा संशोधनाभिमुख दृष्टिकोन, सखोल विषयज्ञान आणि विद्यार्थ्यांशी असलेला सुसंवाद त्यांना एक प्रभावी शिक्षक, कुशल मार्गदर्शक आणि संशोधक म्हणून भूगोल विषयात एक विशेष स्थान प्राप्त करून देतो.

 


 

पर्यावरण जागृती 
Environmental Awareness
Author :
Dr. Rajkumar Govindrao Pawale
Dr. Bhagwat Named Pastapure

ISBN 978-93-6342-270-4

Copyright © Authors
: First Editon : 
1 April 2025

0

Average Rating

0%Recommended

Submit Your Review

Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product

Research...

₹ 39 ₹ 50
Product
Product
Product
Product

मला...

₹ 20 ₹ 40
Product
Product
Product
Product
Product