प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली
Duration: | Unlimited |
---|---|
Book Pages: | 0 |
Audio Book Price: |
₹ 9
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली ही हजारो वर्षांची वैचारिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. ब्रिटिश काळात पारंपरिक शिक्षण पद्धतीकडे दुर्लक्ष करून पाश्चिमात्य शिक्षणाला प्राधान्य दिले गेले. यामुळे प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली मागे पडली. स्वातंत्र्यानंतर भारताने आपली शैक्षणिक दिशा निश्चित केली, परंतु आंतरविद्याशाखीय शिक्षणाचा अभाव राहिला. त्यामुळे २०२० च्या नवीन शैक्षणिक धोरणात प्राचीन भारतीय ज्ञानप्रणालीला आधुनिक तंत्रज्ञान व विचारसरणीबरोबर एकत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ज्ञानप्रणालीच्या माध्यमातून समाजशास्त्र, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, गणित, शिल्पकला इत्यादी विविध शाखांचा समावेश करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे. ‘प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली’ या विषयाचा अभ्यास अनिवार्य करून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य, नैतिकता, सांस्कृतिक परंपरेची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ही प्रणाली राष्ट्रीय विकासात मोलाची भूमिका बजावते.
अभ्यासक्रम
१: भारतीय ज्ञान परंपरेची ओळख
१. परिभाषा
२. उद्दिष्टे
३. समकालीन महत्व
४. भारतीय शिक्षण आणि शैक्षणिक संस्थांचा ऐतिहासिक आढावा
२: भारतीय तत्त्वज्ञान प्रणाली
१. आस्तिक प्रणाली : (सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा) स्वरूप, संकल्पना आणि साहित्य
२. नास्तिक प्रणाली (बौद्ध धर्म, जैन धर्म आणि चार्वाक) स्वरूप, संकल्पना आणि साहित्य
३ : मानवतावादातील योगदान
१. भारतातील शास्त्रीय भाषांची ओळख (संस्कृत, पाली, मागधी)
२. प्राचीन भारतीय कला (संगीत, नाटक) आणि स्थापत्यकला (मंदिर आणि शहर नियोजन) यांची ओळख
३. सामाजिक संस्थांवरील भारतीय तत्वविचार (पुरुषार्थ, आश्रम, धर्म आणि मूल्ये)
४. भारतीय अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्राची ओळख (मूलभूत संकल्पना)
४: एसटीईएम (STEM) (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) मध्ये योगदान
१. भारतातील गणित आणि खगोलशास्त्राचा ऐतिहासिक विकास
२. आरोग्य आणि औषधोपचार पद्धतींची ओळखः आयुर्वेद आणि जीवनशैली (ऋतूचर्या, दिनचर्या इत्यादी) यांचा चरक, सुश्रुतआणि वाग्भट यांच्यासंदर्भात आढावा
३. धातुकर्म आणि पदार्थ विज्ञानाशी संबंधित प्राचीन भारतीय तंत्रज्ञान आणि उपलब्धी
४. प्राचीन भारतीय शेती पद्धती

- --
- --
: लेखक :
डॉ. संजय विश्वंभरराव क्षिरसागर
एम.ए. (इंग्रजी), एम.एड्., पीएच.डी. (शिक्षणशास्त्र)
सहाय्यक प्राध्यापक संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर (COCSIT)